अक्षय्य तृतीयेची पूजा कशी करावी? | How to do Akshaya Tritiya puja at home in Marathi?
अक्षय्य तृतीयेची पूजा कशी करावी? | How to do Akshaya Tritiya puja at home in Marathi?पुजा कशी करावी ?
- अक्षय्य तृतीया दिनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते.
- या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
- वास्तविक या दिनी सोने खरेदीचा सल्ला दिला जातो.
- नेहमीप्रमाणे प्रातःविधी उरकल्यानंतर पूजनाचा संकल्प करावा.
- एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिके ठेवावीत.
- दोन्ही देवतांचे आवाहन करावे.
- पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद-कुंकू वाहावे.
- उपलब्ध फुले अर्पण करावीत.
- तुळशीची पाने वाहावीत.
- धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी.
- घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी. यथाशक्ती दान करावे.
No comments:
Post a Comment